
पायाभूत सविधांच्या विकासाची आपल्याकडची प्रक्रिया किती खाचखळग्यांनी भरलेली आणि नागमोडी चालीने चालणारी आहे, याची कल्पना यायची असेल तर नवी मुंबई विमानतळ हे त्याचे उत्तम उदाहरण. हा खडतर प्रवास पूर्ण करून अखेर नवी मुंबई विमानतळावरील प्रवासी विमानाची पहिली चाचणी पार पडली, याची नोंद घ्यावी लागेल. याचे कारण आर्थिक-औद्योगिक विकासासाठी वाहतुकीच्या जलद आणि आनुषंगिक सर्व सेवा अद्ययावत असणे ही पूर्वअट असते. परंतु ते साधण्यासाठी ज्या अग्निदिव्यातून जावे लागते, त्यातून आपल्या व्यवस्थेतील उणीवांचेच दर्शन घडते.