

Regional Relations Need A Separate Approach As Neighboring Countries Differ In Their Political Economic And Social Conditions
sakal
- शेखर गुप्ता
असुरक्षिततेच्या भावनेला खतपाणी घालणे भारतीय जनता पक्षाला राजकीयदृष्ट्या सोयीचे ठरू शकते; पण त्यातून पाकिस्तान आणि बांगलादेशला भारतावर दबाव आणण्याची संधी मिळते, हे लक्षात घ्यायला हवे.
दाजे दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत भारताच्या शेजारी देशांतील परिस्थिती आता अधिक गुंतागुंतीची झालेली आहे. भारतासाठी महत्त्वाची बाब म्हणजे शेजारी देशांमधील हे संकट किंवा बिघडलेले संबंध आता आपल्या देशांतर्गत राजकारणाचाही केंद्रबिंदू बनले आहेत. परराष्ट्र व्यवहारांचा, विशेषतः शेजारी देशांशी संबंधित प्रश्नांचा देशांतर्गत राजकारणात होणारा समावेश काही धोके निर्माण करतात आणि त्याचा देशाच्या राष्ट्रीय हिताला फटका बसत आहे, असा युक्तिवाद केला जात आहे.