अग्रलेख : बिहारी ग्रँडस्लॅम!

Nitish Kumar Bihar CM resignation : ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तींच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देशाला मिळावा हा ‘राज्यसभा’ निर्माण करण्याचा हेतू होता. प्रत्यक्षात पक्षांनी हा राजकीय सोयीचा मामला करून टाकला.
Nitish Kumar Bihar CM resignation

Nitish Kumar Bihar CM resignation

esakal

Updated on

अग्रलेख

दोन दशकांपासून बिहारमध्ये भाजपला अपेक्षित असलेले ‘सत्तांतर’ विनासायास होत आहे. वयाची पंचाहत्तरी गाठताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडून राज्यसभेत जाण्याचा मार्ग पत्करला. गेल्या २१ वर्षांत दहावेळा मुख्यमंत्रिपद भूषविणारे नितीश कुमार बिहारच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. ज्या मुख्यमंत्रिपदावर राहण्यासाठी त्यांनी अनेकदा कोलांटउड्या मारल्या; त्या पदासाठी भाजपला आपल्या अटी-शर्तींवर तडजोड करण्यास भाग पाडले, तेच मुख्यमंत्रिपद त्यांनी उत्स्फूर्तपणे सोडले असेल, यावर विश्वास बसणे अवघड आहे. नितीश कुमार यांच्या जागी आपला मुख्यमंत्री असावा म्हणून वाजपेयी-अडवाणींच्या काळापासून भाजप प्रयत्न करीत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com