

court
ESakal
कोणत्याही दडपणाविना चालणारे खटले आणि दोषी व्यक्तींना शिक्षा या सगळ्या उद्दिष्टांच्या मार्गात वेगवेगळ्या पातळ्यांवर येणारे अडथळे म्हणजे न्यायाच्या प्रस्थापनेतील मोठी आव्हाने आहेत.
‘कायद्यासमोर सर्व समान’ हे आधुनिक सुसंस्कृत समाजातील एक महत्त्वाचे तत्त्व आहे. किंबहुना लोकशाही शासनव्यवस्थेचाही तो पाया आहे. सरंजामशाहीतील पारंपरिक अधिकारशाहीची गढी उद्ध्वस्त करूनच तो पाया भक्कम होऊ शकतो. परंतु आपल्याकडे अद्याप त्या जुनाट पद्धतीचे अवशेष कसे टिकून आहेत, याची विषण्ण करणारी जाणीव काही घटनांनी करून दिली आहे.