esakal | ऑफलाइन डिक्‍शनरी-मराठी शब्दकोश
sakal

बोलून बातमी शोधा

ऑफलाइन डिक्‍शनरी-मराठी शब्दकोश

ऑफलाइन लाइटवेट ऑप्टिमाइझ केलेले इंग्रजी-मराठी शब्दकोश यासाठी ‘मराठी शब्दकोश’ हे ‘साहित्य चिंतन’चे ॲप अतिशय उपयोगी आहे. जलद, ऑफलाइन संदर्भ, तसेच मराठी व इंग्रजी शब्द शिकण्यासाठी हे मार्गदर्शकही आहे. हे ॲप म्हणजे जवळजवळ सर्व शब्दांसाठी इंग्रजी-मराठी अर्थ देणारा संदर्भकोश आहे.

ऑफलाइन डिक्‍शनरी-मराठी शब्दकोश

sakal_logo
By
डॉ. दीपक ताटपुजे

दैनंदिन कामात आपल्याला अनेक वेळा इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ आवश्‍यक वाटतात. त्यासाठी आपण ‘गुगल’ अथवा अन्य भाषांतर करणारे प्लॅटफॉर्म वापरतो. मात्र त्यासाठी इंटरनेटची जोडणी आवश्‍यक असते. ऑफलाइन लाइटवेट ऑप्टिमाइझ केलेले इंग्रजी-मराठी शब्दकोश यासाठी ‘मराठी शब्दकोश’ हे ‘साहित्य चिंतन’चे ॲप अतिशय उपयोगी आहे. जलद, ऑफलाइन संदर्भ, तसेच मराठी व इंग्रजी शब्द शिकण्यासाठी हे मार्गदर्शकही आहे. हे ॲप म्हणजे जवळजवळ सर्व शब्दांसाठी इंग्रजी-मराठी अर्थ देणारा संदर्भकोश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘इंग्रजी ते मराठी शब्दकोश’ ॲप हा एक विनामूल्य ऑफलाइन शब्दकोश आहे, जो मराठी भाषकांना इंग्रजी भाषा कौशल्ये शिकण्यास आणि इंग्रजी सुधारण्यास मदत करील अशा पद्धतीने डिझाइन केलेला आहे, असे पदोपदी जाणवते. हलक्‍या वजनाचे म्हणजेच कमीत कमी मेमरी स्पेस लागणारे (साधारण ९.५ मेगा बाइट्‌स) हे अँड्रॉइड डिक्‍शनरी ॲप्लिकेशन प्रभावीपणे ऑफलाइन कार्य करते. हे ॲप कमीत कमी वेळात इंग्रजी-मराठी शब्दांसाठी वेगवान परिणाम देते. या ॲपमध्ये ६५ हजारांपेक्षा जास्त इंग्रजी- मराठी शब्द व त्यांचे संदर्भ आहेत. या ॲपमध्ये आपल्याला शब्द व त्याचे उच्चारण, शब्द प्रकार, इंग्रजी अर्थ आणि मराठी अर्थ असे शब्द संदर्भ मिळतील. हे वेगवान आणि विनामूल्य ॲप व्याकरण, परिभाषा, उच्चारण, प्रतिशब्द आणि प्रतिशब्दांसह विस्तृत अर्थसुद्धा संदर्भासाठी देते. त्यात शब्दांचा सर्वात मोठा डेटाबेस आहे, जो ऑफलाइनही उपलब्ध आहे. 

इंटरनेट कनेक्‍शनची आवश्‍यकता नाही 
‘साहित्य चिंतन’चे हे ॲप ऑफलाइन मोडसह इंग्रजी ते मराठी शब्दकोश इंग्रजी, तसेच मराठी कार्यक्षमतेने शिकण्यास मदत करते. एकदा हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर कोणत्याही विशिष्ट कार्यासाठी इंटरनेट कनेक्‍शनची आवश्‍यकता नाही. आपल्याकडे नेट कनेक्‍शन नसताना आपण हा शब्दकोश आपल्या मोबाईलमध्ये वापरण्यासाठी सर्वत्र घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे या ॲपची उपयुक्तता अन्य याच प्रकारच्या ॲपच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोबाईल फोनबरोबरच टॅब्लेट, प्लेबुक, नोटबुक इत्यादीवर या ॲपचे सॉफ्टवेअर चालते. व्यावसायिक, विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञ, तसेच ज्या कोणालाही कामावर किंवा घरी सध्याच्या इंग्रजीचा व्यापक आणि अधिकृत शब्दकोश आवश्‍यक आहे ती गरज हे ॲप पूर्ण करते. आपण टाइप करणे सुरू करतो तेव्हा, टाइप केलेल्या अक्षरासह प्रारंभ होणारे काही शब्द दिसतात. हा शब्दकोश जुळणाऱ्या शब्दांसाठी डेटाबेसमध्ये शोधतो आणि आपल्याला सुधारित शोध परिणाम देतो.

द्विभाषिक संपादन कौशल्यासाठी उपयुक्त
इंग्रजी-मराठी वाक्‍यांचे भाषांतर आणि इंग्रजी-मराठी शब्दांचे समांतर अर्थ यांची प्रक्रिया स्वतंत्र असल्याने हे ॲप वापरताना आपल्याला शब्दसमृद्धी सहजपणे विकसित करता येऊ शकते. भाषेवरील शब्दप्रभुत्व व द्विभाषिक संपादन कौशल्यासाठी हे ॲप उपयुक्त आहे. समांतर अर्थांच्या इंग्रजी-मराठी पर्यायी शब्दांचे परिणामकारक आणि डाटाबेसमधील जलद शोध हे या ऑफलाइन ॲपचे मोठे बलस्थान आहे. बोलीभाषा, मराठी शब्दांचे अर्थ, समांतर अर्थांचे पर्यायी शब्द आणि योग्य भाषांतर ही या शब्दकोशाची वैशिष्ट्ये आहेत.

loading image