
अमेरिकी वर्चस्ववादाच्या आणि आपल्याकडे सध्या प्रचलीत भाषा वापरायची तर ‘टगेगिरी’च्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा स्थळ-काळाला व्यापून आहेत. खरे तर या देशाची दोन रूपे आहेत. मूलभूत विज्ञानसंशोधनाला वाव आणि प्रोत्साहन देणारा, लोकशाही मानणारा, समृद्धीची कास धरणारा आणि प्रत्येक क्षेत्रात गुणवत्तेची शिखरे गाठायची या ध्यासाने झपाटलेला देश हे त्याचे एक रूप आहे. ते कोणी नाकारत नाही. परंतु दुसरे जे रूप आहे ते जगात अमेरिकी महासत्तेचे वर्चस्व टिकविण्यासाठीच्या विधिनिषेधशून्य राजकारणाचे.