
एक राष्ट्र- एक निवडणूक’ या १२९ व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने अठराव्या लोकसभेत मोदी सरकार आणि विरोधी पक्षांमधील पहिल्या शक्तिप्रदर्शनाची झलक सादर झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याविषयी चर्चेत असलेला विचार त्यामुळे मार्गी लागणार आहे. विरोधाची पर्वा न करता कलम ३७० रद्द करणारे, तोंडी तलाकसंबंधीचे आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे अशी विधेयके संमत करुन आश्वासनांच्या अंमलबजावणीबाबत मोदी सरकारने लौकिक मिळवला आहे.