

Power Shift in Politics as Opposition Weakens
sakal
प्र त्येक निवडणूक ही जणू अस्तित्वाचा लढा असल्यासारखी लढवायची आणि सर्व बळ पणाला लावायचे, ही भारतीय जनता पक्षाची शैली एव्हाना परिचित झाली आहे. सत्ताधारी अशा रीतीने राजकारणाकडे पाहत असताना त्याविरोधात लढण्याची प्रखर इच्छाशक्ती विरोधक मात्र हरवून बसलेत की काय, अशी शंका येते. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत याच विषम लढाईचे प्रतिबिंब पडलेले दिसते. या निवडणुकांत भाजपने मिळविलेला कौल निःसंदिग्ध आहे. या निकालातील सरशीचा अर्थ राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिलेला पसंतीचा कौल असा लावू नये, असेही म्हणण्याची विरोधकांना सोय नाही, याचे कारण पक्षांच्या चिन्हावरच निवडणुका लढवल्या गेल्या.