देशात २५ ते ६४ वयोगटातील काम करण्यास सक्षम असलेल्यांची संख्या ९६ कोटींहून अधिक आहे. सरकारचा नवा निर्णय पचनी पडणारा नाही.
नोकरीत असताना केलेली बचत, प्रॉव्हिडंट फंड किंवा ग्रॅच्युइटीचा आनंद घेत निवृत्तीनंतर आरामखुर्चीत डोलत जगावे, मुलाबाळांच्या संसारवेली मांडवावर चढताना बघावे आणि शांतपणे निजधामाला निघून जावे, अशी जीवनाबद्दलची सर्वसामान्य कल्पना असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी असेच चित्र होते, आता मात्र जग बदलले. नोकरीनंतरची नोकरी ही संकल्पना रुजू लागली आहे.