

Community Participation in Local Development How Public Involvement Strengthens Governance and Creates Better Communities
sakal
देशाच्या किंवा राज्याच्या प्रगतीचा कणा हा नेहमीच सक्षम पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. देशातील मेट्रोचे जाळे आज तब्बल २६ शहरांमधील १२५० किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारले. हा टप्पा कौतुकास्पद आहे. विकासप्रक्रियेमागे राजकीय इच्छाशक्ती उभी राहात असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. तरीही पुढील ५० वर्षांच्या भविष्यातील वास्तवाचा वेध घेण्याची वेळ आली आहे, हेही नमूद करायला हवे. आगामी अर्धशतकात देशाची लोकसंख्या, शहरीकरणाचा प्रचंड वेग आणि वातावरणीय बदल यांचे कठीण आलेख पाहता, उभ्या राहत असलेल्या सुविधा दीर्घकाळ पुरेशा पडतील का, हाही विचार करावा लागेल. त्यावर तोडगे शोधायचे असतील, तर विकासप्रक्रियेकडे अधिक गांभीर्याने आणि समग्र दृष्टिकोनांतून पाहायला हवे.