
शिक्षणाचे धोरण ठरविताना त्याच्या फायद्या-तोट्यांचा, परिणामांचा नीट अंदाज घ्यावा लागतो. नेमके आपल्याला काय साध्य करायचे आहे, याची वैचारिक स्पष्टता नसेल तर धोरणात्मक हेलकावे खाल्ले जातात आणि त्याचा दुष्परिणाम शिक्षणक्षेत्रावर होतो. पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणाचे असे झालेले दिसते. शिक्षणातील गळती थांबविणे, या उद्देशाने या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याचा निर्णय झाला होता. तो आता बदलण्यात आला आहे.