
दक्षिण आशियात सध्या जाणवत असलेली राजकीय अस्थिरता भारतासाठी राजनैतिक आव्हान आहे. बांगलादेशातील अस्थिरतेमुळेते आणखी गंभीरपणे समोर ही समस्या आली आहे. बांगलादेशातील राजकारणाने भारतविरोधी वळण घेण्याची कारणे अनेक आहेत, पण त्याचे आंतरराष्ट्रीय संदर्भही लक्षात घ्यावे लागतात. प्रत्येक देशाला आपली स्वतःची अशी ओळख असते. फार मोठी आर्थिक-लष्करी ताकद नसेल, आकाराने लहान देश असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ती ओळख ठसविण्यात अपयश येते.