

Political Setback After Assembly and Local Body Elections
esakal
वर्षभरापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरच्या निष्क्रियतेमुळे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचे उत्तर २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांमधील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा ग्रामीण महाराष्ट्रातील पाया उखडून टाकणाऱ्या पराभवातून मिळाले आहे. विधानसभेतील पराभवामुळे नाउमेद न होता कंबर कसून उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी नव्या निर्धाराने मैदानात उतरले असते तर त्यांच्या पक्षावर ही अवस्था ओढवली नसती आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या; तसेच त्यांच्याशी युती करणारे राज ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बिकट झाला नसता.