ट्रम्प यांच्या कारभारामुळे मुळातच अस्तित्वात असलेला अमेरिकी दुभंग दिवसेंदिवस धारदार होत चालला आहे. त्या दुभंगाला नवी परिमाणे लाभत आहेत.
कोणत्याही सत्ताधाऱ्याच्या धोरणात्मक भूमिकेचा पायाच जर पूर्वग्रह, तात्कालिक आणि संकुचित विचारसरणी यांवर आधारलेला असेल तर प्रगती आणि विकास तर सोडाच; पण अस्तित्वात असलेल्या स्थैर्यालाही तडा जातो. अमेरिकेत सध्या याचाच प्रत्यय ढळढळीतपणे येत आहे.