
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १८० देशांवर लावलेल्या आयातशुल्कामुळे जगभरातील शेअर बाजारात हाहाकार उडून त्याचे तीव्र पडसाद अमेरिकेच्याच शेअर बाजारात आणि तिथल्या नागरिकांमध्ये उमटू लागले आहेत. ट्रम्प यांनी चीनवर ५४ टक्के आयातशुल्क लावल्यानंतर चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर ३४ टक्के आयातशुल्क लावण्याची घोषणा केली. त्यामुळे शुक्रवारी a शेअर बाजारातील डॉऊ जोन्स, नॅस्डॅक आणि एस अँड पी-५०० या निर्देशांकांमध्ये प्रत्येकी पाच टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आणि सोमवारी आशियाई आणि युरोपियन शेअरबाजारांमध्ये ‘ब्लडबाथ’ होऊन त्याची तीव्र प्रतिक्रिया भारतीय शेअर बाजारांतही उमटली.