अग्रलेख : ट्रम्प यांचे ‘शुल्क’काष्ठ

US Supreme Court IEEPA Ruling : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे सरसकट आयात शुल्क धोरण बेकायदा ठरवल्यानंतर, त्यांनी मध्यावधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ टक्के नवीन जागतिक आयात शुल्क लागू करून जागतिक व्यापार आणि भारत-अमेरिका करारापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
US Supreme Court IEEPA Ruling

US Supreme Court IEEPA Ruling

sakal

Updated on

अग्रलेख

ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पाच नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विरोधात निकाल देऊन केलेल्या प्रहाराला न जुमानता त्यांनी आयात शुल्काचे धोरण पुढे सुरू ठेवण्यासाठी लगेच पर्यायी कायदेशीर मार्ग निवडले आहेत.

अमेरिका आयात करीत असलेल्या सर्वच वस्तूंवर सरसकट आयातशुल्क लावण्याचा अधिकार ‘इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट’अंतर्गत अमेरिकेच्या अध्यक्षांना नसून तो केवळ अमेरिकी संसद म्हणजे काँग्रेसला आहे, असा निर्वाळा देत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सहा विरुद्ध तीन अशा बहुमताने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापक ‘जशास तसे’ आयातशुल्क रद्द करून त्यांना जबरदस्त दणका दिला. पण या निकालामुळे ‘जखमी’ झालेले ट्रम्प अमेरिका आणि जगासाठी अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com