अग्रलेख : युद्धखोराचे शांतिपाठ

Trump Gaza Peace Board controversy : गाझात आधी गाढवाचा नांगर फिरविल्यानंतर ट्रम्प त्या भागाचा रिसॉर्ट म्हणून विकास करणार आहेत. त्यासाठीच नागरी प्राधिकरणाचा घाट घालण्यात आला.
Trump Gaza Peace Board controversy

Trump Gaza Peace Board controversy

esakal

Updated on

अग्रलेख

मानवी उत्क्रांतीचा इतिहास हा जसा युद्धाचा आहे, तसाच तो शांततेचादेखील आहे. तसे पाहता युद्ध अन् शांतता दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू; पण युद्ध लादणाऱ्यापेक्षा तो टाळणारा कधीही श्रेष्ठ ठरतो. काळ बदलला तसेच युद्धतंत्रही बदलले; पण कायम राहिले ते माणसाच्या मनातील कपट. जगभरात सुरू असलेली युद्धे पाहिली की त्यामागचे कपट अधोरेखित होते. ज्यांनी युद्ध लादले तीच मंडळी आज शांततेची कबुतरे उडवू पाहात आहेत, ज्यांनी निष्पापांच्या गळ्यांवर थंड डोक्याने सुरा फिरविला त्यांनीच आता शांतिगीत गाण्याची तयारी चालवली आहे. गाझामध्ये इस्राईलपुरस्कृत वंशसंहाराला अमेरिकेचे असलेले पाठबळ हे उघड सत्य आहे. अख्ख्या गाझाची स्मशानभूमी झाल्यानंतर तिच्या उद्धारासाठी शांतिमंडळाची घोषणा करणे, ही दांभिकता आहे. याबाबतीत ट्रम्प यांचे निर्ढावलेपण इतके की त्यांनी ही घोषणा केली ती दावोसमधून. १९ देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये गाझा शांतता मंडळाचा उद् घाटन सोहळा पार पडला. या नोबेलभुकेल्या नेत्याने स्वतःला त्याच व्यासपीठावरून ‘पीसमेकर’ म्हणून जाहीर केले आहे. इतरांनीही तितक्या निलाजरेपणाने टाळ्या वाजवून त्याला अनुमोदन दिले. ट्रम्प यांनी या सोहळ्यासाठी ५० देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण पाठविले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com