बारा दिवसांच्या युद्धाचे चटके केवळ इस्राईल आणि इराणलाच नव्हे तर अमेरिकेसारख्या महाशक्तीलाही बसून सर्वांचीच झाकली मूठ उघडू लागली होती.
युद्धात झालेल्या ‘जखमा’ चिघळू लागल्या की युद्धोन्माद ओसरु लागतो. पश्चिम आशियासह अवघ्या जगाचा श्वास रोखून धरणाऱ्या १२ दिवसांच्या युद्धाचे चटके केवळ इस्राईल आणि इराणलाच नव्हे तर अमेरिकेलाही बसून सर्वांचीच झाकली मूठ उघडू लागली होती. हा संघर्ष आटोक्याबाहेर जाणे कोणालाच परवडणारे नव्हते.