

When Dominance Turns Toxic: A Warning for Democracy
Sakal
जगाच्या ऊर्जा गरजा भागविण्यासाठी खनिज तेलासारखा अन्य हुकमी आणि सामर्थ्यशाली पर्याय नसल्याचे अधोरेखित झाल्यापासून अमेरिकेने आरंभलेल्या दंडेलशाहीला सहा दशके होतील. पश्चिम आशिया आणि ओपेक देशांच्या उदयापूर्वी जगभरातील खनिज तेलावर नियंत्रण असलेल्या एक्झॉन मोबिल, शेवरॉन, शेल, मोबिल, ब्रिटिश पेट्रोलियम या पूर्वाश्रमीच्या अमेरिकी-युरोपियन सप्तभगिनींचे वर्चस्व निरंतर कायम राखण्यासाठी प्रत्येकवेळी रचलेल्या बनावाचे नेतृत्व सभ्यतेचा आव आणणाऱ्या युरोपियन देशांच्या मूकसंमतीने अमेरिका बेधडकपणे करीत असते. व्हेनेझुएलावरील हल्ला हे अमेरिकेच्या त्याच धूर्त साम्राज्यवादी बनावाची ताजी आवृत्ती आहे.