Growing Trend of Unopposed Victories in Maharashtra Civic Elections
sakal
महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांमधील दोन हजार ८६९ नगरसेवकपदांसाठीचा रणसंग्राम सध्या सुरू झाला आहे. या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ तारखेला मतमोजणीपूर्वीच तब्बल ७० नगरसेवक बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आलेले जवळपास सर्वच नगरसेवक हे सत्ताधारी महायुतीचे आहेत. त्यांच्याविरोधातील इतर सर्व पक्षांतील उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या ७० उमेदवारांचा नगरसेवक बनण्याचा मार्ग मोकळा झाला.