Agriculture Loss
sakal
केवळ सत्ताकेंद्रित राजकारण आणि लोकांचे प्रश्न तोंडी लावण्यापुरते, असेच राज्यातील राजकारणाचे सध्याचे चित्र दिसते.
अवकाळी पावसाने कंबरडे मोडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश, महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना यांसारख्या ज्वलंत प्रश्नांमुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रश्नांना मागे ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांत मात्र युती-आघाडीची समीकरणे जुळवणे आणि कथित मतचोरी प्रकरणावरून हमरीतुमरी रंगलेली दिसते.