

US Policy on Greenland and Europe
sakal
अमेरिकी साम्राज्यवादी हस्तक्षेपाचे उघडेवागडे दर्शन घडविण्याच्या डोनाल्ड ट्रम्पकृत नाट्याचा चालू अंक ग्रीनलॅंडमध्ये त्यांनी चालविलेल्या कारवायांत पाहायला मिळत आहे. महायुद्धोत्तर काळात जगाने किमान सहमती म्हणून जी मूल्यचौकट स्वीकारली होती, ती अक्षरशः पायदळी तुडविण्याचे काम सध्या सुरू असून व्हेनेझुएलाप्रमाणेच ग्रीनलॅंडच्या सार्वभौमत्वाचीही पत्रास न बाळगण्याचा उद्दाम पवित्रा ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. युरोपने निषेध नोंदविण्याचे काम केले, परंतु त्याचा परिणाम होण्याची चिन्हे नाहीत.