
काही माणसे विशिष्ट पदावर नेमली गेली की, नव्या जबाबदारीमुळे ती अधिक उन्नत होतात, पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी धडपडतात. तर काहींवर मात्र पदामुळे येणारी सत्ता स्वार होते आणि त्यांना आपल्या पदाच्या मर्यादा आणि चौकट यांचेही भान राहात नाही. सध्या आपल्या व्यवस्थेत दुर्दैवाने दुसऱ्या प्रकारातील व्यक्तींचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यातही असे प्रकार जेव्हा न्यायिक पदांबाबत होतात, तेव्हा चिंता आणखी गडद होते.