

Youth Power Emerges as a Force for Change
sakal
अनेकदा विविध राजकीय घडामोडींचे वरकरणी स्वरूप वेगळे असते आणि त्या त्या समाजाच्या तळाशी काही वेगळेच खदखदत असते. नीट निरखले तर त्या अस्वस्थतेची लक्षणे निवडणुकांमधून दिसू शकतात. त्याची दखल घेतली नाही, तर मात्र त्या अस्वस्थेतेचे उद्रेक होतात आणि त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागते. नुकत्याच झालेल्या बांगलादेश आणि नेपाळच्या निवडणूकनिकालाचे इतरही अनेक पैलू असले तरी ‘जेन झी’ने ठळकपणे दाखवून दिलेले अस्तित्व हा दोन्ही निवडणुकांतील एक समान मुद्दा आहे. या तरुणाईच्या आकांक्षांची दखल न घेणे आता कोणत्याही राजकीय नेत्यांना परवडणारे नाही. नेपाळमध्ये सप्टेंबर २०२५मध्ये उठाव झाला. या आंदोलनात प्रामुख्याने ‘झेन-झी’चा सहभाग होता.