‘पटक देंगे’ का मतलब..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 8 जानेवारी 2019

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० पौष शु. प्रतिपदा.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार :
पुरे झाली खडाखडी
पुरे आता हुलझपट!
अंगावर येईल त्याला
धर आणि उचलून आपट!

......................................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सर्वशक्‍तिमान श्रीमान मोटाभाई ह्यांच्या तसबिरीपुढे बारा सूर्यनमस्कार घालून झाल्यावरच सदर मजकूर लिहायला घेतला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हल्ली सकाळचा व्यायाम सुरू केला आहे.

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० पौष शु. प्रतिपदा.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार :
पुरे झाली खडाखडी
पुरे आता हुलझपट!
अंगावर येईल त्याला
धर आणि उचलून आपट!

......................................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सर्वशक्‍तिमान श्रीमान मोटाभाई ह्यांच्या तसबिरीपुढे बारा सूर्यनमस्कार घालून झाल्यावरच सदर मजकूर लिहायला घेतला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हल्ली सकाळचा व्यायाम सुरू केला आहे.
- चार दिवस झाले! नव्या वर्षी रोज व्यायाम करण्याचा संकल्प केला होता. पहिल्या तारखेला स्पोर्टस शूजच्या नाड्या बांधण्यात अर्धा तास गेला. त्यात ४४० क्‍यालरीज जळल्या! मग शूज काढून टाकले. (त्यात पुन्हा २३० क्‍यालरीज जळल्या...) म्हटले, आज एवढा व्यायाम पुरे. उगीच थकवा नको! दुसऱ्या आणि तिसऱ्या तारखेलाही साधारणत: तसेच घडले. वीकेंडला व्यायामाला सुटी द्यायची, असे संकल्प करतानाच ठरले होते. तसा मंत्रिमंडळात ठरावही करणार होतो. मी व्यायामाला लागलो, ह्याखातर आमचे संकटमोचक व्यायामवीर मंत्री गिरीशभाऊ महाजन ह्यांनी अभिनंदन केले होते. माझ्या नव्या उपक्रमाला पाठिंबा म्हणून काही सहकाऱ्यांनीही व्यायाम करण्याचे कबूल केले होते. तथापि, नव्या वर्षाचा संकल्प इतक्‍या लौकर कामास येईल, ह्याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. पण रविवारी लातुरात व्यायामाचे खरे महत्त्व आणि हेतू ध्यानी आला!! कारण तेथे सर्वशक्‍तिमान मोटाभाई आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते.

लातूरच्या मांडवात मोटाभाईंच्या स्वागताला उभा होतो. मोटाभाई मोटारीतून उतरले, आणि तडक चालत माझ्याकडे आले. माझा दंड चाचपून बघितला. ‘जमकर वर्जिश करो’ असे (स्वत: घाम पुसत) म्हणाले. ‘‘ रोज करतो व्यायाम मोटाभाई...’’ मी नम्रतेने म्हणालो. मोटाभाईंच्या निव्वळ दर्शनहेळामात्रें आम्हां कार्यकर्त्यांच्या शरीरात बारा हत्तींचे बळ संचारते.
‘‘युतीचा विचार करू नका...हुई तो ठीक नहीं तो पटक देंगे!’’ असे त्यांनी कार्यकर्त्यांना सहजपणे एक कागद मेजावर आपटून सांगितले. मांडवात त्याक्षणी उत्साहाची अशी काही लहर पसरली की तिथं शेकडो कार्यकर्ते नसून हजारे हत्तीच आहेत, असा भास झाला. (एक कार्यकर्ता इज इक्‍वल टु बारा हत्ती ह्या समीकरणानुसार हजारो!) कार्यक्रमानंतर मोटाभाईंनी भेटून मी सांगितले की भाषण चोक्‍कस झाले!
‘‘युतीमाटे कार्यकर्त्यांमधी खूप क्‍नफ्यूजन आहेत ने!,’’ त्यांनी वस्तुस्थिती विशद केली.

‘‘हो, युती होणार की नाही म्हणून कार्यकर्ते मला जाम छळत होते. आता विषय संपला, हे बरं झालं!’’ मी म्हणालो.
‘‘युती झ्याली तर उनको जिताएंगे, नही हुई तो सबके साथ पटक देंगे!,’’ त्यांनी पुन्हा एकदा आपला बेत सांगितला. हा डावपेच सॉल्लिडच होता.
‘‘पण पटक देंगे म्हंजे नेमकं काय करायचं?,’’ मी विचारून घेतले. नंतर कटकट नको!
‘‘पटक देंगे का मतलब...हुं हुं हुं हुं...हू:!!’’ धोबीघाटावर धोतराचा पिळा उंच उचलून दाणकन हापटण्याची ॲक्‍शन करत त्यांनी ‘पटक देंगे’चा अर्थ स्पष्ट केला.
‘‘अच्छा, पटक देंगे म्हंजे उचलून आपटेंगे...असंच ना?’’ मी खुंटा हलवून बळकट करून घेतला. मी स्वत: दहाबारा मावळ्यांना उचलून आपटतो आहे, असे चित्र डोळ्यासमोरून तरळून गेले.
‘‘एमने एमज...’’ ते म्हणाले.
‘‘मला उगीचच वाटत होतं की ‘पटक देंगे’ म्हंजे ‘पटा लेंगे’!!,’’ मी म्हणालो. मोटाभाई त्यानंतर बरेच विचारात गढून गेलेले बघितले. असो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article