ब्रेड आणि रोझेस! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 8 मार्च 2019

ब्रेड अँड रोझेस, बाई
ब्रेड अँड रोझेस!
घोषणा ऐकून पोरी अजून
किती उत्साहित होतेस?

शंभर वर्ष होऊन गेली
अजूनही तुझे तेच!
तेच कष्ट, तेच दु:ख
तश्‍शीच लागते ठेच!

तुझ्या आधीच्या
काही जणी
होत्या घास
‘‘नुसता घास नको, शेठ
हवा गुलाबाचा सुवास!’’

पोटासाठी घास हवा,
गंध!
अन्यायाच्या कोठडीत
नशीब आहे बंद!

ब्रेड अँड रोझेस, बाई
ब्रेड अँड रोझेस!
तुझ्यामुळे मर्दांच्या
तोंडाला आला फेस!

नको होतं तेव्हा तिला
अंगभर सोनं नाणं
च्या शय्येवरचं
अक्‍कडबाज जगणं!

ब्रेड अँड रोझेस, बाई
ब्रेड अँड रोझेस!
घोषणा ऐकून पोरी अजून
किती उत्साहित होतेस?

शंभर वर्ष होऊन गेली
अजूनही तुझे तेच!
तेच कष्ट, तेच दु:ख
तश्‍शीच लागते ठेच!

तुझ्या आधीच्या
काही जणी
होत्या घास
‘‘नुसता घास नको, शेठ
हवा गुलाबाचा सुवास!’’

पोटासाठी घास हवा,
गंध!
अन्यायाच्या कोठडीत
नशीब आहे बंद!

ब्रेड अँड रोझेस, बाई
ब्रेड अँड रोझेस!
तुझ्यामुळे मर्दांच्या
तोंडाला आला फेस!

नको होतं तेव्हा तिला
अंगभर सोनं नाणं
च्या शय्येवरचं
अक्‍कडबाज जगणं!

स्वप्न नव्हती संगमरवरी
नव्हती मखमलीची आस
हवा होता तिला फक्‍त
श्‍वास

श्‍वास म्हंजे
चेष्टा वाटली काय?
इतकी महाग वस्तू कोणी
देतं काय?

रूढींच्या ढिगाऱ्याखाली
पिचून गेली होतीस
उंबऱ्याआडच्या घुसमटीनं
खचून गेली होतीस

---च्या दुनियेचा
भारीच होता डाव!
क्षणात प्रेम, क्षणात भक्‍ती
क्षणात डोक्‍यात घाव!

देवी काय, माता काय,
हात काय जोडतील
नाकदुऱ्या काढून काढून
नंबरी देखावा करतील

बेटी म्हणजे लोढणं
शेवटी परक्‍याचंच धन
कोंडलेलं
केविलवाणं मन

वाढुळ वयात आलीस
पोरी आता जरा जपून
गल्लीमधली कोल्हीकुत्री
येतील अंगावर धावून

अंगभर कपड्यात
वावर
वर करु नक़ो
घरचं तेवढं आवर

जमेल तितकंच शिक
किंवा फेकून दे त्या वह्या
शिवण,टिपण, रांधावाढप
ह्यातच आटप बया!

राब राब राबून एकदा
होऊन जा माती
बाईचा जलम असाच,
त्याची हीच दैवगती

नकोस बये आता
ं जू!
पडले पाठीवर
तरी नको हूं की चूं!

ब्रेड आणि रोझेस बये,
ब्रेड आणि रोझेस
अजूनही त्याच्यासाठी
किती किती झुरतेस?

हवं तरी काय तुला
सांगून टाक पुन्हा
लेडीज फर्स्ट ऐकत ऐकत
चढून जा जिना

जिना चढत असताना
विसरुन जा लोढणं
लोढणं नाही म्हणायचं
त्याला, ती तर पैंजणं!

अजूनही बये तुझं
तेच चालू आहे,

---ंची दुनिया तुझं
धारिष्ट्य की पाहे

स्त्रीशक्‍तीचं आम्हालाही
आहे म्हटलं कौतुक
हिला दिनाला पाठवू
आम्ही मेसेज सहेतुक!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article