रा-फेल! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 9 मार्च 2019

बेटा : (अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण..! मम्मा, आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (कामात व्यग्र) हं...हं!
बेटा : (निरुत्साहाने) ‘हंहं’ काय? आयॅम बॅक हे माझं पोलिटिकल स्टेटमेंट आहे!!
मम्मामॅडम  : (नव्या उमेदीने) आता स्टेटमेंटची नाही, ॲक्‍शनची गरज आहे!! साडेचार वर्षं ज्याची वाट पाहत होते, ते इलेक्‍शन एकदाचं आलं!!
बेटा : (साफ दुर्लक्ष करत) मम्मा, माझं म्हणणं पुन्हा एकदा खरं ठरलं!
मम्मामॅडम : (कौतुकानं) तुझं म्हणणं नेहमीच खरं असतं बेटा!

बेटा : (अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण..! मम्मा, आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (कामात व्यग्र) हं...हं!
बेटा : (निरुत्साहाने) ‘हंहं’ काय? आयॅम बॅक हे माझं पोलिटिकल स्टेटमेंट आहे!!
मम्मामॅडम  : (नव्या उमेदीने) आता स्टेटमेंटची नाही, ॲक्‍शनची गरज आहे!! साडेचार वर्षं ज्याची वाट पाहत होते, ते इलेक्‍शन एकदाचं आलं!!
बेटा : (साफ दुर्लक्ष करत) मम्मा, माझं म्हणणं पुन्हा एकदा खरं ठरलं!
मम्मामॅडम : (कौतुकानं) तुझं म्हणणं नेहमीच खरं असतं बेटा!
बेटा : (विजयी मुद्रेनं) पण माझं हे म्हणणं खरंच खरं ठरलं! (आठवण्याचा प्रयत्न करत) काय बरं म्हंटात त्याला...हां, शतप्रतिशत खरं ठरलं!!
मम्मामॅडम : (नाक मुरडून) शतप्रतिशत हा शब्द आता उच्चारायचासुद्धा नाही बरं!! कुठलं म्हणणं खरं ठरलं तुझं?
बेटा : (मूठ वळून) हेच...चौकीदारही चोर है!!
मम्मामॅडम : (अतीव कौतुकानं) कम्मालच आहे तुझी! ‘चौकीदार चोर है’ ह्या तुझ्या वाक्‍यानं वातावरण बदलून गेलंय अगदी!! अशी आणखी काही वाक्‍य काढ बाहेर! उपयोग होईल!!
बेटा : (आणखी उत्साहानं) अर्थात, मी त्याच कामाला लागलोय! काल मी एक नवं वाक्‍य देशाला दिलं!!
मम्मामॅडम : (उत्सुकतेनं) कुठलं रे?
बेटा : (खट्याळपणाने) ग..ग...ग...गायब हो गया! हाहा!!
मम्मामॅडम : (मनापासून हसत) चांगलीच फिरकी घेतलीस तू! शाब्बास...आता पुढले काही दिवस असंच सुरू ठेव! म्हंजे तेच गायब होतील!! हाहा!!
बेटा : (उच्चरवात) देखो भय्या, पहले किसानों की कीमत गायब हो गई, बाद में रोजगार गायब हो गया, बिजली गायब हो गई...अब राफेल के कागज गायब हो गये!! मेहंगाई और भ्रष्टाचार छोडकर सबकुछ गायब हो रहा है!! अब गायब होने जैसा जो बचा है, बो भी गायब होगा!!
मम्मामॅडम : (डोळे भरून पाहात) टॉप क्‍लास!!  (दिवास्वप्नांमध्ये रमत)...कुठून आपण तो राफेल विमानांचा करार केला असं झालं असेल ‘त्यांना’!!
बेटा : (न उमजून) ‘ते’ कोण?
मम्मामॅडम : (फणकारून) मी ते नावदेखील उच्चारत नाही कधी!! पण बरा धडा शिकवलास त्यांना!! मला तर वाटतं, पुढली काही वर्षं ते विमानातला ‘फ’सुद्धा उच्चारणार नाहीत!
बेटा : (निरागसपणे) विमानात ‘फ’ असतो?
मम्मामॅडम : (खुलासा करत) फजितीमधला ‘फ’ आहेच ना!! पण...(तपास अधिकाऱ्याच्या आविर्भावात) पण कुछ तो गडबड है! आय मीन...काहीतरी घोळ दिसतोय! चौकीदार चोर है, इथंवर ठीक आहे, पुढची स्टोरी नीट जुळत नाहीए!!
बेटा : (खांदे उडवत) न जुळायला काय झालं? चौकीदाराने कागद चोरून उशाखाली ठेवले! दुसऱ्या पत्रकाराने ते त्याच्या उशीखालून लांबवले आणि पेपरात छापले!! सोप्पं तर आहे!!
मम्मामॅडम : (येरझारा करत) ह्याचा अर्थ कागदांची दोनदा चोरी झाली! करेक्‍ट!!
बेटा : (विषय झटकून टाकत) काही का असेना, चौकीदार चोर है, हे तर खरं आहे ना? मग झालं तर...जस्ट डोण्ट वरी! मी सगळं पुढे नीट करीन!! माझा प्लॅन तयार आहे!!
मम्मामॅडम : (चिंताग्रस्त अवस्थेत) कसला प्लॅन? आता इलेक्‍शनची तयारी करा!!
बेटा : (दोन्ही हात पसरत) इलेक्‍शननंतर अर्थातच मी पीएम असेन! पीएम झाल्यावर मी पहिला निर्णय राफेलचा घेणार आहे!  
मम्मामॅडम : (कडवटपणे) घेऊन टाक! आपल्याला नकोत ती तसली विमानं!! न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी!!
बेटा : (हाताची घडी घालत) राफेलचा करार रद्द नाही करणार मी! फक्‍त त्याचं नाव बदलून ‘रा-फेल’ एवढंच ठेवणार आहे! कळलं ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article