युद्धाचा नियम! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 23 मार्च 2019

कौरवांचे सैन्यशिबिर उजळले
होते सहस्र पलित्यांनी.
अतिरथी-महारथींच्या तंबूंभोवताली
सुरक्षाप्रहरींनी स्थाने बदलली,
पेटत्या अग्निशिखांमध्ये
पुनश्‍च एकवार इंधन पडले...
इष्ट ते ईशनाम घेऊन
पितामह भीष्मांनी अखेर
मंचकावर टेकवली पाठ, तेव्हा
मध्यरात्रीचा प्रहर उलटला होता...

दारावरील पडदा हलताच
सावध पितामहांचा हात
आपापत: गेला उशाखाली...
दुर्योधन उभा होता, आणि
त्याच्यापाठोपाठ एक अनौरस छाया...

कौरवांचे सैन्यशिबिर उजळले
होते सहस्र पलित्यांनी.
अतिरथी-महारथींच्या तंबूंभोवताली
सुरक्षाप्रहरींनी स्थाने बदलली,
पेटत्या अग्निशिखांमध्ये
पुनश्‍च एकवार इंधन पडले...
इष्ट ते ईशनाम घेऊन
पितामह भीष्मांनी अखेर
मंचकावर टेकवली पाठ, तेव्हा
मध्यरात्रीचा प्रहर उलटला होता...

दारावरील पडदा हलताच
सावध पितामहांचा हात
आपापत: गेला उशाखाली...
दुर्योधन उभा होता, आणि
त्याच्यापाठोपाठ एक अनौरस छाया...

उद्दाम उपरणे खांद्यावर फेकत
दुर्योधन म्हणाला : पितामह, ऐका,
तुमचे लढण्याचे वय निघून गेले,
बाहूंत किती त्राण उरले आहेत,
तेही काळच जाणतो!
तरीही तुम्ही माझ्या प्रिय मित्र
कर्णाचा वारंवार अपमान करता...
हे योग्य नव्हे!’’

‘‘तो अर्धरथी? त्याच्यासाठी
तू मध्यरात्री माझी झोपमोड
करतो आहेस, दुर्योधना?’’
संतप्त सुरात भीष्मांनी
कानउघाडणी केली...
दुर्योधनाच्या पाठीमागे
उभ्या असलेल्या सावलीची
झाली अस्वस्थ हालचाल

क्षणभर खाकरून दुर्योधन अखेर
कोरड्या सुरात म्हणाला :
पितामह, शत्रूला निर्णायक
पाणी पाजणारा अर्धरथी
खरा की वार्धक्‍याने जर्जर
झालेला पराक्रमी महारथी?
कोण अधिक मोलाचा?
हा युद्धव्यवहार आहे, पितामह!
मला वाटतं की, आपण
शस्त्र खाली ठेवून
युद्धाचे नेतृत्व कर्णाच्या
हाती सोपवावे, हे ठीक!’’

वार्धक्‍याच्या आरोपाने
घायाळ झालेल्या भीष्मांच्या
डोळ्यांसमोरून क्षणार्धात
तरळत गेला भूतकाळाचा पट.
-स्खलनशील पित्याचे चारित्र्य.
-पिता शांतनुची स्त्रीइच्छा पूर्ण
करण्यासाठी घेतलेली
आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा.
- ढिल्या बुद्धीच्या भावाच्या,
विचित्रवीर्याच्या विवाहासाठी
अंबा, अंबिका, अंबालिकाचे
 केलेले अपहरण.
-अंबेचा शाप आणि प्रतिशोध.
- गुरुवर्य परशुरामाशी लढलेले
तेवीस दिवसांचे अनिर्णित युद्ध.
वगैरे वगैरे वगैरे.

काहीही न बोलता पितामह
शय्येवरच पडून राहिले.
अखेर दुर्योधन म्हणाला :
‘‘हे गांगेया, आम्हाला तुम्ही
अजूनही हवे आहात, पण
ते आदर्श पुरुष म्हणून,
योद्धा म्हणून नव्हे!
तुमच्या हातात आता शस्त्र नव्हे,
आशीर्वाद शोभून दिसतात!
नाही का?’’

पुढे इच्छामरणी पितामह भीष्मांनी
शरशय्येवर देह ठेवला.
योद्धा वृद्ध झाला की
त्याने आशीर्वादापुरते
उरायचे असते,
हादेखील युद्धाचाच नियम!
एवढेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article