और एक जुमला? (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 27 मार्च 2019

बेटा : (अत्यंत विजयी मुद्रेने) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, लो मैं आ गया!
मम्मामॅडम : (वर्तमानपत्र चाळत) हं!
बेटा : मैंने दिया हुआ नेहले पर देहला कैसा लगा?
मम्मामॅडम : ही वेळ आहे का पत्ते खेळण्याची?
बेटा : (पाय हापटत) मी पत्त्यांबद्दल बोलत नाहीए!
मम्मामॅडम : नेहला, देहला काहीतरी म्हणत होतास!
बेटा : (कुरकुरत) देशातली गरिबी कशी हटवली जाईल, ह्याचा आख्खा प्लॅन मी एका फटक्‍यात दिला! तुम्हाला त्याचं काहीच नाही!!
मम्मामॅडम : (पेपरची घडी उलगडत) कोण निघालंय गरिबी हटवायला?
बेटा : (आत्मविश्‍वासाने) मी! दुसरं कोण?

बेटा : (अत्यंत विजयी मुद्रेने) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, लो मैं आ गया!
मम्मामॅडम : (वर्तमानपत्र चाळत) हं!
बेटा : मैंने दिया हुआ नेहले पर देहला कैसा लगा?
मम्मामॅडम : ही वेळ आहे का पत्ते खेळण्याची?
बेटा : (पाय हापटत) मी पत्त्यांबद्दल बोलत नाहीए!
मम्मामॅडम : नेहला, देहला काहीतरी म्हणत होतास!
बेटा : (कुरकुरत) देशातली गरिबी कशी हटवली जाईल, ह्याचा आख्खा प्लॅन मी एका फटक्‍यात दिला! तुम्हाला त्याचं काहीच नाही!!
मम्मामॅडम : (पेपरची घडी उलगडत) कोण निघालंय गरिबी हटवायला?
बेटा : (आत्मविश्‍वासाने) मी! दुसरं कोण?
मम्मामॅडम : (वेगळ्याच विचारात) गरिबी हटवणं का इतकं सोपं आहे? तुझ्या आज्जीनं अडोतीस वर्षांपूर्वीच गरिबी हटवण्याची घोषणा दिली होती! तेव्हापासून आपण गरिबी हटवतोच आहोत!
बेटा : नाऊ, इट इज मॅटर ऑफ टाइम! मी पीएम झालो की तत्काळ गरिबी हटणार! इस देश में कोई भी गरीब नहीं रहेगा! प्रत्येकाला मिनिमम बारा हजार दरमहा मिळणारच! बघशील तू! मी तशी योजनाच दिली आहे!!
मम्मामॅडम : (फार इंटरेस्ट न दाखवता) मनमोहन अंकलना दाखवलीस का योजना?
बेटा : (सहज सांगितल्यागत) दाखवली ना! ते म्हणाले, ‘‘माझा सीव्ही फुकट गेला! गरिबी अशी हटवता येईल, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं!’’
मम्मामॅडम : (नवलानं) खरंच असं म्हणाले ते?
बेटा : (खांदे उडवत) एग्झॅक्‍टली असं म्हणाले नाहीत! तसं तर ते काहीच म्हणाले नाहीत! नुसतं ‘हं’ म्हणाले!! पण त्यांच्या त्या ‘हं’मध्ये सगळं होतं!!
मम्मामॅडम : (अविश्‍वासानं) कुठल्या तरी अर्थतज्ज्ञाला दाखवून घे तुझी स्कीम! नंतर कटकटी नकोत!!
बेटा : (संभ्रमात पडत) मनमोहन अंकलपेक्षा मोठा अर्थतज्ज्ञ देशात कोण आहे?
मम्मामॅडम : (सावधगिरीच्या पवित्र्यात) प्रियंकादीदीला दाखवून घे एकदा! तिचं मत विचार!!
बेटा : (उडवून लावत) बोटयात्रेनंतर तिची रेलयात्रा होणार आहे, त्यात ती बिझी आहे! नंतर विमानयात्रा आहेच!! तिला कशाला त्रास द्यायचा? (ठामपणाने) मी सांगतो माझी ‘न्याय’ योजनाच गरिबी हटवण्याचा एकमेव उपाय आहे!  
मम्मामॅडम : (गंभीरपणे) काय आहे तुझी योजना?
बेटा : (अर्थतज्ज्ञाच्या सुरात) पाच कोटी कुटुंबांना दरमहा बारा हजार रुपये द्यायचे! पाच कोटी कुटुंब इज इक्‍वल टू पंचवीस कोटी लोक! बारं बारे बहात्तरासे! म्हंजे वर्षाला ७२ हजार! विषय संपला!!
मम्मामॅडम : (चक्रावून) आणि हे पैसे आणायचे कुठून?
बेटा : (कपाळाला आठ्या) आणायला कशाला लागतात? आहेत ते द्यायचे, आहे काय नि नाही काय?
मम्मामॅडम : (गयावया करत) इतकं सोपं असतं तर आधीच झालं असतं की रे!!
बेटा : (मुद्दा रेटत) तेच म्हणतोय मी...हे अर्थशास्त्रवाले उगीचच मोठमोठी विशेषणं वापरून भीती दाखवतात आपल्याला! मी म्हटलं, नथिंग डुइंग! देखो भय्या, हम नहीं चाहते की इस देश में दोन भारत हो- एक अमीरों का, दुसरा गरिबों का!! गरिबी हटाव ये मेरे दादी का सपना था, वो मैं अब पूरा करने जा रहा हूँ!!
मम्मामॅडम : (हादरून) पीएम झाल्यावर तू ही स्कीम आणणार का नक्‍की?
बेटा : (खात्री देत) अफकोर्स!! व्हाय नॉट! हम गरीब, मजदूर और किसानों के लिए तो काम करते हैं!!
मम्मामॅडम : (खचून) ओह गॉड! मला अचानक पंधरा लाख खात्यात जमा करण्याचा जुमला आठवला बघ!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article