इलेक्‍शन, इलेक्‍शन! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 16 मे 2019

कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे
पुलाखालून बराच मैला,
पाणी वाहून ऱ्हायलं आहे

संपेल सगळा खेळ सारा,
हवा होईल थोडी गार
तडकलेल्या माहौलावर
बरसेल केव्हा पाण्याची धार

जिंकणाऱ्याची फुगेल छाती
हारणाऱ्याची होईल माती
पुरे आता, झालंय अती

किती विखार, किती बुखार
असा चढून ऱ्हायला आहे
कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे...

इलेक्‍शनच्या नादापायी
आमचं सारंच विस्कटलं की
जमलं जमलं म्हणेतोवर
पुन्हा एकदा फिस्कटलं की

कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे
पुलाखालून बराच मैला,
पाणी वाहून ऱ्हायलं आहे

संपेल सगळा खेळ सारा,
हवा होईल थोडी गार
तडकलेल्या माहौलावर
बरसेल केव्हा पाण्याची धार

जिंकणाऱ्याची फुगेल छाती
हारणाऱ्याची होईल माती
पुरे आता, झालंय अती

किती विखार, किती बुखार
असा चढून ऱ्हायला आहे
कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे...

इलेक्‍शनच्या नादापायी
आमचं सारंच विस्कटलं की
जमलं जमलं म्हणेतोवर
पुन्हा एकदा फिस्कटलं की

रडू नका मुळू मुळू
करु नका दळु दळू
बरं होईल हळु हळू

लोकशाहीचा ज्वर सध्या
जोरात चढून ऱ्हायला आहे
कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे...

दोस्तान्यातले मित्रसुद्धा
बघता बघता झाले दुश्‍मन
काल गळ्यात गळे होते,
आज नळावरचं भांडण

दोस्ती अशी विसरतात?
इतकं खाली घसरतात?
वेडंवाकडं पसरतात?

लोकशाहीच्या नावाखाली
सगळंच तुटून ऱ्हायलं आहे
कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे...

एक होता ‘कमळ’वाला,
दुजा जुना ‘हात’वाला
इलेक्‍शनच्या निमित्तानं
दोघांमध्ये राडा झाला

गठबंधनवाले राहिले वायले
त्यांचंच गाणं गात ऱ्हायले
कोण कुठे कधी गेले?

राजकारणाचं गणित असलं
सुटून नाही ऱ्हायलं आहे
कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे...

ताई, माई, अक्‍का, अण्णा,
आबा, बापू, आणि दादा
नका डोक्‍यात राख घालू
हा तर आहे गोरखधंदा

पॉलिटिक्‍सचा नको शाप
फुकटचा हा नको ताप
नका खिशात बाळगू साप

पॉलिटिक्‍सच्या पायीच इथं
वाटोळं होऊन ऱ्हायलं आहे
कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे...

चार वर्षांनी एकदा येतो
अंगणात आपल्या असा शिमगा
कोण कुणाच्या उरावर बसतो
कोण घालतो कुठे दंगा

कोणाचीही येवो सत्ता
ज्याचा खल, त्याचा बत्ता
त्यांचीच वाढणार मालमत्ता

आपल्या व्होटवर त्यांचं सगळं
मस्तच फावून ऱ्हायलं आहे
कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे...

इलेक्‍शनचा शिमगा संपला
की सारं काही छान होईल
दोस्त भेटतील दोस्तांना अन्‌
ईर्षेचं वारं कमी होईल

हाणामाऱ्या संपू देत
विखार सारा मावळू देत
दोस्त दोस्तांना भेटू देत

आपलाच आहे देश गड्यांनो,
बाकी सगळं फजूल आहे
कधी एकदा संपतं इलेक्‍शन
असं वाटून ऱ्हायलं आहे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article