ढिंग टांग : ज्येष्ठ!

ब्रिटिश नंदी
शनिवार, 8 जून 2019

बकाल झाली पखाल येथील
रिक्‍त मनाची शुभ्र मेघुटे
चरचरणाऱ्या चराचरामधि
जीवित्वाची शिळी संपुटे

कंठकोरड्या आकांताला
मुक्‍या मनाची तुटकी ढाल
दुष्काळाचे गाणे म्हणता
भवतालाचा चुकतो ताल

निष्पर्णाच्या फांदोऱ्यावर
घरटे शेणामेणाचे
मुग्ध कावळी तशात बघते
स्वप्न आपुल्या पिल्लांचे

उडता उडता एक पारवा
धुळित कोसळे घेऊन तान
विझणाऱ्या डोळ्यातच त्याच्या
पाणवठ्याचे स्वप्न महान

कुठे कोरडी खोल बावडी
खर्वडते पोटातील माती
वांझ उसासे तिचे कोंदले
‘‘कधिकाळी मी होते गरती’’

बकाल झाली पखाल येथील
रिक्‍त मनाची शुभ्र मेघुटे
चरचरणाऱ्या चराचरामधि
जीवित्वाची शिळी संपुटे

कंठकोरड्या आकांताला
मुक्‍या मनाची तुटकी ढाल
दुष्काळाचे गाणे म्हणता
भवतालाचा चुकतो ताल

निष्पर्णाच्या फांदोऱ्यावर
घरटे शेणामेणाचे
मुग्ध कावळी तशात बघते
स्वप्न आपुल्या पिल्लांचे

उडता उडता एक पारवा
धुळित कोसळे घेऊन तान
विझणाऱ्या डोळ्यातच त्याच्या
पाणवठ्याचे स्वप्न महान

कुठे कोरडी खोल बावडी
खर्वडते पोटातील माती
वांझ उसासे तिचे कोंदले
‘‘कधिकाळी मी होते गरती’’

कुठे तिठ्‌यावर मुकाट हपशी
खोल उसासे टाकितसे
घोटभराच्या जगण्यासाठी
रोज तिठ्यावर तिचे हसे

आक्रसलेल्या जीर्ण सावलीत
दुमडून बसले एक सुणें
विश्‍वेश्‍वर तू, सांग अता की
काय जाहले अधिकउणे

आभाळाच्या सोसापायी
पायाखाली फुटे धरा
भेगाळाचे प्राक्‍तन अपुले
सटवाईची जुनी तऱ्हा

जगणे होते असे कुलुंगी
उजाडले का सगळे गाव
खडखडणाऱ्या टॅंकरमागे
जो तो घेई तहानधाव

रिक्‍त घागरी, खोल पिपे
अन्‌ उपडे हंडे, पातेली
मरण व्यापिले तरीही का रे
अंत पाहसी वनमाली?

उदासलेल्या जीवित्वावर
तहानलेली मरणकळा
लसलसणाऱ्या क्रूर उन्हांच्या
जाळत जाती पुन्हा झळा

तनामनाला रोज भिवडते
वैराणाचा पडछाया
क्षितिजावरती मृगजळ हलते
उगा फसविते जळमाया

भूमीवरती असा मांडिला
दुष्काळाचा हलकल्लोळ
आभाळाच्या मौनामध्ये
उग्र उन्हाचे सदैव लोळ

नभात जेव्हा मौन नांदते
अशांत होते सारे पार्थिव
नभ मेघांनी आक्रमिताना
जगण्याची अन्‌ होते जाणीव

अगा विठ्ठला, बरस असा की
अंकुर अंकुर पुन्हा फुटावे
ज्येष्ठ लागला, क्षितिजावरती
मेघ जांभळे पुन्हा दिसावे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article