ढिंग टांग : हवा-इ-सियासत!

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 14 जून 2019

वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसांनी आपल्याला खुफिया खत लिखतो आहे. हे खत कोड लॅंग्वेज याने की मराठीमध्ये लिखतो आहे, कारण ही जुबान महाराष्ट्रातल्या अनेक मराठी अवामलाही बदन येत नाही, असे मालूम पडले आहे. (खुलासा : ‘धड’ ह्या लब्जचा अर्थ ऊर्दू-मराठी डिक्‍शनरीमध्ये बदन असा दिला आहे. दुरुस्त आहे ना?) खत पढून झाल्यावर फाडून टाकावे. खुदानखास्ता, न पढताच आग-ए-बंबमध्ये घालू नये, अशी माझी इत्तला आहे.

वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसांनी आपल्याला खुफिया खत लिखतो आहे. हे खत कोड लॅंग्वेज याने की मराठीमध्ये लिखतो आहे, कारण ही जुबान महाराष्ट्रातल्या अनेक मराठी अवामलाही बदन येत नाही, असे मालूम पडले आहे. (खुलासा : ‘धड’ ह्या लब्जचा अर्थ ऊर्दू-मराठी डिक्‍शनरीमध्ये बदन असा दिला आहे. दुरुस्त आहे ना?) खत पढून झाल्यावर फाडून टाकावे. खुदानखास्ता, न पढताच आग-ए-बंबमध्ये घालू नये, अशी माझी इत्तला आहे.

जनाब, सबसे पहले आपको बधाई! आम चुनावमध्ये आपण बहुत बहुत जियादा व्होटांनी जीत हासिल केलीत. मी तेव्हा आपल्याला फोन केला होता. दोन्ही मुल्कान अमन याने की शांतीचा माहौल असावा, ह्यासाठी आपण कोशीश करू, असे तेव्हा मी म्हटले होते, याद आहे का? तेव्हा ‘‘शांतिबिंती कुछ नही...बालाकोट याद आहे का?’’ असे तुम्ही घुश्‍शात म्हणालात. मी म्हणालो, ‘‘जनाब, घुस्सा पी जाओ, नये हिंदोस्तां के साथ मुझे नया पाकिस्तान भी खडा करने दो’’ असे दोस्तीचे आवाहन केले होते. लेकिन वो हो न सका. आपल्या दोन्ही मुल्कात कश्‍मीरच्या मसल्यावरून जे काही चालले आहे, त्याने माझ्या दिलाला खूप यातना होत आहेत. इतक्‍या की त्यावर मी एक अशआरही पढला होता. तो असा :
यातना-ए-दिल अब कैसे सहे हरदम
खुजली पर बीटेक्‍स लगाऊं या कोई मरहम
मेरेही बाऊन्सर पर हुआ न कोई हादसा
छक्‍का लगाया कंबख्तने हर बॉल पे धमधम

....कसा वाटला माझा अशआर? हा अशआर मी चंद नामाबर पाकी गजलकारांना दाखवला होता. त्यांनी दाद-ए-रुमाल दिली. ज्यांनी दिली नाही, ते पेशावरच्या आसपास गधे वळायला गेले आहेत. रहने दो.

अमनशांतीसाठी मी गेले काही दिवस खूब कोशीश करत आहे. हिंदोस्तां हा आपला पडोसी आहे, त्याच्याशी चांगले वागा असे मी आमच्या आयएसआयला सांगितले. पण त्यांनी अक्षरश: आयएसआयचा उद्धार केला. क्‍या करूं? हमारे दुश्‍मन सिर्फ सरहदपार नहीं, बल्के मुल्कातही आहेत. पुन्हा रहने दो.
जनाब मोदीसाहब, एससीओच्या मीटिंगला किर्गिझस्तानला जाताना आपण आमच्या मुल्काची हवा-इ-जगह याने की एअरस्पेस वापरणार होता ना? तुमचे हवाई जहाज आमच्या आस्मानातून जाणार, म्हणून मी किती उत्साही झालो होतो. मी खूप इंतजार केला. तुमचे हवाईजहाज वरून जात असताना आपण हात हलवून सलाम करावा, ह्या इराद्याने मी माझ्या गरीबखान्याच्या गच्चीवर जाऊन खडा झालो!! लेकिन तुमचे हवाईजहाज गुजरलेच नाही!! दिल खट्टा हो गया...

आमच्या हवा-इ-जगहमधून पास होताना तुम्हाला काही दगाफटका होईल असे वाटले का? यह आपकी गलतफहमी आहे, जनाब! मागल्या खेपेला अफगाणिस्तानातून परत येत असताना तुम्ही अचानक पाकिस्तानात उतरून जनाब नवाझ शरीफ ह्यांच्या घरच्या शादीसाठी हाजिरनाजिर राहिलात. तसे काही तुम्हाला पुन्हा करायचे आहे का? परतीच्या प्रवासात तुम्ही खरेच तसे काही करण्याचा इरादा ठेवत असाल, तर हा नाचीज बंदा फिर एक बार बोहला-इ-शादीसाठी खडा राहील, ह्याची गॅरंटी देतो. विचार करा आणि कळवा. शुक्रिया मेहेरबानी. आपका अपना. इमरान.
ता. क. : परवा मी डिट्टो तुमच्या स्टाइलने ‘इस मुल्क को नुकसान पहुंचनेवालों को मैंने छोडना नहीं है...’ असे आमच्याकडे ठणकावून सांगितले आहे. मला इथली अवाम हल्ली ‘मियांमोदी’ असे संबोधू लागले आहेत. शुक्रिया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article