

ISRO History
sakal
भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राचा पाया रचणारे शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. आयुष्याची शतकी वाटचाल यशस्वीरितीने करणारे डॉ. चिटणीस यांचे कार्य व त्यांची बहुमोल कारकीर्द यांना उजाळा देणाऱ्या काही आठवणी. डॉ. एकनाथ चिटणीस हे डॉ. विक्रम साराभाई यांचे सहकारी. त्यांनी डॉ. साराभाई यांच्याप्रमाणंच भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या निधनाने संशोधन क्षेत्रातील एक अध्याय समाप्त झाला.