
Election Commission
Sakal
श्रीकांत ठाकूर
आपल्या देशातली लोकशाही ही राज्यघटनेच्या भक्कम पायावर उभारलेली आहे. या लोकशाहीचा गाभा म्हणजे मतदारांचा विश्वास. परंतु अलीकडच्या काळात मतदार याद्यांतील गोंधळ, दुहेरी नावे, मृत व्यक्तींची नोंद कायम ठेवली जाणे, अपूर्ण पत्ते, तसेच अचानक मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळणे वा समावेश यामुळे निवडणूक प्रक्रियेची शुचिता आणि निवडणूक आयोगावरील विश्वास यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात भर म्हणून मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज व व्हिडिओतल्या नोंदी केवळ पंचेचाळीस दिवसांसाठीच संग्रहित करण्याचा नियम, पारदर्शकतेवर आळा घालणारा ठरत आहे.