
मनोज दिसले
देशात २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा कालावधी नेत्रदान पंधरवडा म्हणून पाळला जातो. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये २५ ऑगस्टला नेत्रदानाचा अर्ज भरला होता. त्यामुळे हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. या १५ दिवसात देशात सर्वत्र नेत्रदानाबद्दल जनजागृतीचे काम केले जाते. गैरसमजुती आणि नेत्रदानाविषयी अनास्था यामुळे अजूनही आपल्याकडे नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. आपलेच लाखो अंध बांधव नेत्रदानाकडे डोळे लावून बसले आहेत. आपणच त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण देऊ शकता.