ढिंग टांग : चातकाचे पर्जन्यपत्र...!

उध्दव ठाकरे न येण्याने वरिष्ठ सभागृहात ‘चातकासारख्या’ वाट पाहणाऱ्या जुन्या मित्राची हळवी, उपरोधिक पत्रकथा; महाविकास आघाडी, महायुती, काँग्रेसच्या डावपेचांवरही चिमटे
"Missing You in the House": A Satirical Take on Fadnavis-Thackeray Rivalry

"Missing You in the House": A Satirical Take on Fadnavis-Thackeray Rivalry

Sakal

Updated on

प्रिय माजी मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम! काय लिहू? लिहिण्यासारखे बरेच आहे. कुठून सुरवात करू? (हे तुमच्या भाषणासारखेच झाले...) चातक नावाचा एक पक्षी असतो. तो फक्त पावसाचेच पाणी पितो. नळाच्या किंवा बाटलीतल्या पाण्याला तोंडदेखील लावत नाही. अतिशय स्वाभिमानी पक्षी आहे. अशा चातकाने ‘पिऊ पिऊ पी पी पिऊ’ अशी साद घालत पावसाची वाट पाहावी, तशी आम्ही तुमची वाट पाहात होतो. वरिष्ठ सभागृहात तुम्ही पुन्हा अवतीर्ण व्हाल, एकदोन दिवसांकरता का होईना, पण याल, असे वाटले होते.

तुम्ही याल, मग आपण नेहमीप्रमाणे लिफ्टमध्ये भेटू, हास्यविनोद करून दिवसभर चालतील, अशा ब्रेकिंग न्यूज जोडीने देऊ, असे अनेक मांडे मी मनातल्या मनात खात होतो. तुमच्या महाविकास आघाडीतर्फे (खीक...खुक...ख्यॅक) एकमेव उमेदवार म्हणून तुमचेच नाव घोषित होणार, असे ऐकून होतो. त्यामुळे मी बेसावध राहिलो, आणि घात झाला. ऐनवेळी तुम्ही अंबादासजी दानवे यांचे नाव पुढे केले, आणि स्वत: घरातच बसलात!! इतके का आमच्यावर रुसलात? इतके का आम्ही नकोसे झालो? इतके का आमचे तोंड तुम्हाला पाहावत नाही? अंबादासजीदेखील आमचे मित्रच आहेत, पण तुमची उपस्थिती केव्हाही अधिक प्रार्थनीय नव्हती का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com