

Farmers Issues
sakal
ॲड. वसंत मनकर
यापूर्वी केंद्र व राज्य सत्तेतील सरकारांनी शेतकऱ्यांची अनेकवेळा कर्जमाफी केली. मग शेतकऱ्यांचे प्रश्न का संपले नाहीत? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का रोखता आल्या नाहीत? कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या समस्यांवरील औषध नाही, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्याला सक्षम बनविण्यासाठी ठोस धोरणांची गरज आहे.