दुर्ग म्हणजे जाज्ज्वल्य इतिहासाची पुनःपुन्हा आठवण करून देणारी अखंड प्रेरणास्थाने. यातूनच इतिहासाभ्यासाची ओढ निर्माण होते. हे दुर्ग आत्मविश्वास, मानसिक ताकद देतानाच अखंड ऊर्जा देत राहतात. निसर्गातील मोठा ठेवाही या दुर्गांच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळतो. दुर्ग पर्यटनातून हा मुख्य हेतू अधोरेखित होणे आवश्यक आहे.