
‘गुगल’, ‘याहू’, ‘बिंग’ ही सर्च इंजिने वापरून माहितीजालावरील जवळपास काहीही शोधता येते. रोजच्या आयुष्यात आपल्या कामापुरती लागणारी माहिती, एखाद्या विषयाचे आकलन, नवीन काही जाणून घेणे, या कामांसाठी हा साधा शोध पुरतो. अगदी संशोधकही हीच शोधसाधने वापरून शोधपत्रिका आणि ‘पेटंट’विषयक माहिती मिळवतात. तरीही कोणत्याही विषयात आणखी खोलवर जाता येते आणि मिळणारी उत्तरे अगदी विस्मयकारक असतात, हे कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) आपल्याला दाखवून दिले आहे.