

Future of Jobs
sakal
डॉ. दिनेश अमळनेरकर
आपण २०२५-३०च्या निर्णायक टप्प्यात पाऊल ठेवताना जागतिक कामगार बाजारपेठेत मोठे बदल अपेक्षित आहेत. ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’च्या ‘रोजगारांचे भविष्य २०२५’ अहवालानुसार तांत्रिक आधुनिकता, व्यवसायांचे हरित परिवर्तन (ग्रीन ट्रान्झिशन), लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि आर्थिक दबाव या सर्व गोष्टींचा बाजारपेठेवर परिणाम दिसेल. या अहवालात ५५ क्षेत्रांतील १००० व्यवसाय/कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.