
Gajanan Bhaskar Mehendale
sakal
मोरेश्वर जोशी
इतिहासलेखनात शिवचरित्रलेखनाचे अवघड शिवधनुष्य पेलण्याबरोबरच इतिहासलेखनाचा स्वतंत्र मानदंड निर्माण करणारे गजानन भास्कर मेहेंदळे यांचे १७ सप्टेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या लेखनाला शिवधनुष्य म्हणण्याचे कारण असे की, गेल्या दीडशे वर्षांत अनेकांना प्रयत्न करूनही हा विषय पूर्ण करता आला नव्हता.