Hous of Bamboo
sakal
नमस्कार! आदाब…सध्या किनई मला गजलेचा छंद जडला आहे. त्यामुळे नाचीज, कश्मकश, आरजू, विसाल, फलक, अश्क, इश्क वगैरे शब्द गोळा करत रानोमाळ हिंडत्ये आहे. सुरवातीला वाटलं, नुसतं सर्दीपडसं असेल. उन्हाळ्यात होतो काही लोकांना त्रास! पण गजलेचा तापही वाढत चालला आहे. उद्या-रविवारी, पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील सावरकर अध्यासन केंद्राच्या सभागृहात दिवसभराचं ‘गजलविधा संमेलन’ पार पडणार आहे. मी यावेळी पंजाबी आणि लखनवी ड्रेस काढून ठेवला आहे.