अग्रलेख : युद्ध महागाईविरुद्ध

युद्धाच्या ज्वाळांतून पेटलेली महागाई, वाढता आयातखर्च, घटते परकीय चलन व कमकुवत रुपया यामुळे अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान; ऊर्जासुरक्षा, काटकसरीचा वापर व सर्वंकष धोरणांची तातडीची गरज
Global Conflict Impact: How Rising Oil Prices are Shaking India's Economy

Global Conflict Impact: How Rising Oil Prices are Shaking India's Economy

Sakal

Updated on

एखाद्या माणसाला तो काय उत्तरे देतो, यावरून नव्हे, तर तो काय प्रश्‍न विचारतो, यावरून चांगले जोखता येते. — व्हॉल्टेअर

कोणत्याही युद्धात होणारा विध्वंस दीर्घकाळापर्यंत अनिष्ट परिणाम घडवून आणतो. केवळ युद्धग्रस्त देशातच नव्हे तर साऱ्या जगाला त्याचे चटके सहन करावे लागतात. विशेषतः आर्थिक विकासाचे आडाखे, समीकरणे विस्कटून जातात. महागाई डोके वर काढते. त्या गर्तेत गुरफटून जायचे नसेल आणि हे परिणाम कमीत कमी हानिकारक ठरायचे असतील तर सर्वस्तरीय, सर्वंकष प्रयत्न करावे लागतील. आधी परिणामांचा अंदाज घ्यावा लागेल. सध्याच्या परिस्थितीत आयातीचा खर्च वाढत असल्याने आयात-निर्यात व्यापारातील तूट वाढणार. पेट्रोल-डिझेलचे दर वाढू नयेत म्हणून सरकारने उत्पादनशुल्कात सवलत दिल्याने सरकारी महसुलावर परिणाम होईल. करसंकलनही मंदावेल. युद्ध पेटल्यानंतर पश्‍चिम आशियातील देशांतून सुमारे सहा लाख भारतीय मायदेशी परतले आहेत. जगभरातील अनिवासी भारतीयांकडून वर्षाकाठी १३५ अब्ज डॉलर इतके परकी चलन भारतात येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com