
तुम्ही मांसाहारी असाल, विविध प्रकारच्या प्राण्यांचे मांस तुम्ही चवीने खाल्ले असेल. आता मानवी पेशींपासून प्रयोगशाळेत मानवाचेच मांस तयार करण्याचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठीची व्यवस्था अद्याप उभारण्यात आलेली नाही, तसेच असे मांस विक्रीसाठीही अद्याप उपलब्ध नाही. मात्र, असे मांस खायचे की नाही, यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
तुम्ही मांसाहारी असाल, विविध प्रकारच्या प्राण्यांचे मांस तुम्ही चवीने खाल्ले असेल. आता मानवी पेशींपासून प्रयोगशाळेत मानवाचेच मांस तयार करण्याचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठीची व्यवस्था अद्याप उभारण्यात आलेली नाही, तसेच असे मांस विक्रीसाठीही अद्याप उपलब्ध नाही. मात्र, असे मांस खायचे की नाही, यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अमेरिकेतील संशोधकांनी खाद्यपदार्थ तयार करण्याचे एक किट तयार केले आहे. ओरोबोरोस असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. या किटच्या साह्याने मानवी पेशींच्या साह्याने खाण्यायोग्य मांस तयार करता येऊ शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. हे तंत्रज्ञान नजीकच्या भविष्यकाळात घराघरांत वापरता येऊ शकेल असा दावा संशोधकांनी केला आहे.
इजिप्तमधील कथांमध्ये ओरोबोरोस हे एका सर्पाचे नाव आहे. जो सर्प वेटोळा घालून आपलीच शेपटी खाताना दाखविण्यात येतो. ओरोशेफ या कंपनीने हे किट तयार केले आहे. मानवाच्या गालातील पेशी आणि रक्त द्रव (ब्लड सीरम) यांच्यापासून हे मांस तयार करण्यात येते. मानवाच्या मांसाप्रमाणेच ते दिसते. त्यामुळेच तुम्ही तुमचेच मांस खाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रयोग शाळेमध्ये मांस तयार करण्यास सुरुवात होऊन काही वर्षे झाली आहेत. मात्र प्राण्यांच्या मांसाला ते पर्याय ठरलेले नाही. आता माणसाच्या मांसासारखेच मांस प्रयोगशाळेत तयार झाले आहे. ते तयार करण्यासाठी पेशींसोबत ब्लड सीरमची आवश्यकता भासते. हे ब्लड सीरम मुदत संपलेल्या किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास वाया गेलेल्या रक्ताचा वापर यात केला जातो. परंतु, आता हे रक्त न वापरता गाईच्या बछड्यांचे रक्त वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याबाबत प्रकल्पाचे सहसंस्थापक ग्रेस नाइट म्हणाले की, वैद्यकीय व्यवस्थेमध्ये कचरा ठरविण्यात आलेल्या रक्ताचा वापर मांस तयार करण्यासाठी केला जातो. हे सांस्कृतिकदृष्ट्या स्वीकारले जात नाही. परंतु, हे मांस प्रयोगशाळेत तयार केलेले कृत्रिम मांसच आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
माणसाच्या शरीराला आवश्यक असलेल्या प्रथिनांची पूर्तता करण्यासाठी कृत्रिम मांस तयार करण्यात आले आहे. स्वतःचे मांस स्वतः खात आहोत, असा विचार करणे चुकीचे ठरेल, असे मत या प्रकल्पातील संशोधक ओरकन तेल्हन यांनी म्हटले आहे. भविष्यात प्राण्यांचे मांस घेणे प्रचंड खर्चिक होईल, त्यावेळी प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाचा चांगला पर्याय उपलब्ध असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. प्रयोगशाळेत तयार झालेल्या मांसाच्या विक्रीची दुकाने अद्याप सुरू झालेली नाहीत. तसेच प्रयोगशाळेत तयार झालेले मांस माणसाने खाण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र कोणत्याच देशाने दिलेले नाही. तसेच अशा प्रकारच्या मांसाच्या विक्रीचे परवानेही देण्यात आलेले नाहीत. परंतु, भविष्यात याला परवानगी मिळेल, असे गृहीत धरून कृत्रिम मांस निर्मितीच्या क्षेत्रातील कंपन्यांची संख्या वाढते आहे.
असे झाले मांस
Edited By - Prashant Patil