समाजकारणावर मोहोर

नागालॅंडसारख्या मागे राहिलेल्या भागासाठी, तिथल्या तरुण-तरुणींसाठी हेकानी गेली १७ वर्षे काम करत आहेत.
hekani jakhalu Nagaland employment youth skill education
hekani jakhalu Nagaland employment youth skill education sakal
Summary

नागालॅंडसारख्या मागे राहिलेल्या भागासाठी, तिथल्या तरुण-तरुणींसाठी हेकानी गेली १७ वर्षे काम करत आहेत.

तरुणांसाठी नोकरी मेळावे, ग्रामीण भागातील मुलांसाठी कौशल्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत, अपंगांसाठी रोजगार प्रशिक्षण, तरुण उद्योजकांसाठी कार्यशाळा, स्टार्टअपला प्रोत्साहन... अशी विविध प्रकारची कामे करणाऱ्या आणि विकासाचा ध्यास घेतलेल्या हेकानी जखालूकांनी नागालॅंडमध्ये इतिहास घडवला आहे.

hekani jakhalu Nagaland employment youth skill education
Loksabha Election : राज्यातून ४५ खासदार, २०० आमदार निवडून येतील; चंद्रशेखर बावनकुळ

तेथील विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला सदस्य निवडून आल्या. त्यापैकी एक आहेत हेकानी जखालू. गेली १७ वर्षे सातत्याने समाजकारण करणाऱ्या जखालू यांची निवड सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा उत्साह वाढविणारी आहे. नागालॅंडसारख्या मागे राहिलेल्या भागासाठी, तिथल्या तरुण-तरुणींसाठी हेकानी गेली १७ वर्षे काम करत आहेत.

१९६३ मध्ये नागालॅंड विधानसभा अस्तित्वात आली; परंतु तेव्हापासून आजपर्यंत एकही महिला तिथे निवडून आलेली नाही. नागा समाज हा तसा परंपरावादी. त्यामुळे तिथे घरातील निर्णयप्रक्रिया, आर्थिक विषयांत महिलांचा पुढाकार असतो; परंतु सामाजिक, राजकीय क्षेत्रात मात्र पुरुषच पुढे असतात. तिथे महिलांना फारसे स्थान मिळत नाही.

त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांत एकही महिला तिथे विजयी झालेली नाही. राजकारणात महिलांचा सहभाग अत्यल्प असल्याचा तो परिणाम मानला जातो. १९७७ मध्ये पहिल्यांदा राणो मेसे शैझा या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.

hekani jakhalu Nagaland employment youth skill education
Uddhav Thackeray : Khed मध्ये ठाकरेंची जाहीर सभा, काय आहेत कारणं?

त्यानंतर यंदाच्या मार्चमध्ये एस. फंगाॅन कोन्याक या राज्यसभेवर गेल्या आहेत. विधानसभेत महिला म्हणून पहिले पाऊल मात्र हेकानी यांनी टाकले आहे. शिवाय आणखी एक महिला उमेदवार सलहुतून क्रुसे या विजयी झाल्या आहेत.

अठ्ठेचाळीस वर्षीय हेकानी या उच्चविद्याविभूषित आहेत. त्या वकील आहेत. सॅनफ्रॅन्सिस्को विद्यापीठातून त्यांनी एलएलएमची पदवी घेतली. नंतर हार्वर्ड विद्यापीठातही उच्चशिक्षण घेतले. ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ तसेच संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात काही काळ हेकानी यांनी काम केले आहे. शिवाय दिल्ली उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात वकिली केली आहे.

२००५ मध्ये एका कायदेविषयक बाबीसंदर्भात हेकानी नागालॅंडच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तरुणांबाबत खूपच निराशा व्यक्त केली. त्यांच्या रोजगारासाठी सरकार काय करते, हे त्यांनी हेकानी यांना सांगितले; परंतु त्यात फार यश येत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळेच यापुढे आपल्या भूमीतल्या तरुणांसाठी काहीतरी काम करण्याची प्रेरणा हेकानी यांना मिळाली.

hekani jakhalu Nagaland employment youth skill education
Skill India Campaign : नाशिकला क्वालिटी सिटी बनविण्याचा निर्धार

त्या पुन्हा मायभूमीत परतल्या आणि ‘युथनेट’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नागा युवावर्गासाठी काम करण्यास प्रारंभ केला. त्यांना देशाच्या, जगाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करत आहेत. अगदी छोट्या छोट्या उपक्रमांच्या मदतीने मुलींना सक्षम करणे त्यांनी साध्य केले आहे.

सामान्यांच्या शक्तीतूनच असामान्य बदल घडवता येतात, असे हेकानी म्हणतात. त्यामुळेच नागालॅंडच्या युवांमध्ये त्या लोकप्रिय आहेत. भविष्य युवकांच्या हाती आहे, त्यामुळे त्यांना सक्षम करण्याचे ध्येय त्यांनी घेतले आहे.

त्यात त्यांना यशही येत आहे. हेकानी यांच्या कार्यकर्तृत्वाचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. २०१८मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नारीशक्ती पुरस्काराने; तर २०२१ मध्ये ‘शिंडलर इलेक्ट्रिक प्रेरणा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

hekani jakhalu Nagaland employment youth skill education
Pune Election : पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांनी दिला कार्यकर्त्यांना धीर, म्हणाले...

‘नागालॅंडमधला समाज आपली चाकोरी सहसा सोडत नाही. पण आता त्यांचे विचार काळानुसार बदलत आहेत. त्यामुळेच विजय मिळाला,’ असे हेकानी सांगतात. राजकीय घोषणा खूप होतात; पण तशी कामे होत नाहीत, अशी लोकांची धारणा आहे.

ती बदलण्याचे आव्हान आता लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वीकारले आहे. तरुणांसाठी भरीव काम, नागालॅंडच्या महिलांचा आवाज विधानसभेत पोहोचविणे, राज्यातील अल्पसंख्याकांचे प्रश्न; तसेच आपला दिमापूर मतदारसंघ एक रोलमाॅडेल म्हणून राज्यात प्रगतीकडे नेण्याचे उद्दिष्ट हेकानी यांनी ठेवले आहे. ‘मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी कष्ट करा, यश मिळतेच’, असा हेकानी जखालू यांचा विश्वास आहे. त्यांनी स्वतःच त्याचे उदाहरण घालून दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com