मोगरा फुलला, मोगरा फुलला...

भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज (६ फेब्रुवारी) चौथा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीनिमित्त ‘लता मंगेशकर वैद्यक रत्न’ पुरस्कार दिला जातो. या वर्षी हा पुरस्कार डॉ. एस. राजशेखरन यांना दिला जाणार असून, त्या निमित्ताने लतादीदींच्या आठवणींना दिलेला उजाळा...
Hrudaynath Mangeshkar Mogra Phulla Abhang spiritual experience

Hrudaynath Mangeshkar Mogra Phulla Abhang spiritual experience

sakal

Updated on

हृदयनाथ मंगेशकर

मी हातातल्या जाड पुस्तकाकडे कौतुकाने, आदराने पाहिले. कालपासून वाचतोय, पण हातातून पुस्तक सोडवतच नाही. या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर, अवकाशात उदयलेला एक तापहीन मार्तंड झळाळतोय. प्रत्येक पानावर, एक पीयूषाचा अथांगअर्णव हेलावतोय. प्रत्येक पानावर एक अलांछन हिमांशू. प्रकाशतोय. प्रत्येक पानावर आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या इवल्याशा रोपाची लताश्री, बहरतेय प्रत्येक पानावर काळोखाच्या अंगावर, किरणांचा पिसारा उघडून तेजाची लेणी खोदीत बसलेला दीप्त, दीप्तदेवदूत पुंजाळतोय. ज्या दगडी खांबाला वयाच्या सोळाव्या वर्षी टेकून ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका लिहिली, त्या खांबाला ‘पैसखांब’ असे म्हणतात. ‘पैशाचा खांब’ असाही एक वेगळा शब्द या खांबाला आहे. ‘पैस’ म्हणजे सतत प्रसरण पावणारे, अवकाश, ‘पैशाचा खांब’ म्हणजे भाषेचा खांब. या भाषेच्या अवकाशाला टेकून भावार्थदीपिका सांगणाऱ्या माउलींच्या ओव्यांचे अमृतकण पानोपानी सांडलेले, हे पुस्तक मला दीदीने आणून दिले होते. महाराष्ट्रातल्या सर्व संतकवींचे साहित्य. अभंग, विरहिणी, लोकगाणी या पुस्तकात होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com