ढिंग टांग : हंस गया, वो फस गया..!

संसदेत विधेयक पाडून कमळवाल्यांना तोंडघशी पाडल्याचा जल्लोष, ‘दिदी’च्या एका स्मितावर अमित शहांना हसवण्यात यश; ‘जो हंस गया, वो फस गया’ म्हणत आई–लेकाचा आत्मविश्वास टोकाला
ढिंग टांग : "जो हस गया, वो फस गया!" अमित शहांच्या हसण्यावरून माय-लेकाची रंगली 'खसखस'; राजकीय टोलेबाजीचा नवा अंक

ढिंग टांग : "जो हस गया, वो फस गया!" अमित शहांच्या हसण्यावरून माय-लेकाची रंगली 'खसखस'; राजकीय टोलेबाजीचा नवा अंक

Sakal

Updated on

बेटा : (अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (दरवाजाकडे धाव घेत) कित्ती वाट बघत होते मी!! मोस्ट वेलकम माय सन!! ये, ये...ये रे माझ्या विजयीवीरा...ये!! शाब्बास! अस्साच मोठा हो! मला कित्ती आनंद झालाय, म्हणून सांगू?

बेटा : (आत्मविश्वासाने डौलदार पावलं टाकत) थँक्यू! पक्षाच्या कार्यालयातही माझं जंगी स्वागत झालं! शाबासक्यांच्या थापा खाऊन खाऊन पाठ नुसती हुळहुळी झाली आहे!!

मम्मामॅडम : (दातओठ खात) चांगलीच जिरवलीस त्या नतद्रष्ट कमळवाल्यांची! नाहीतरी फार उडत होते! आता चांगले दात पडले ते बरं झालं! पुन्हा असली विधेयकं गळ्यात मारणार नाहीत!!

बेटा : (बेफिकिरीने) ते ठीक आहे...त्यांच्याकडे संख्याबळ नव्हतंच! अर्थात ते आपल्याकडेही नव्हतं!!

मम्मामॅडम : (समाधानाने) पण ते तोंडघशी पडले ना? बास!! याहून अधिक आपल्याला काही नको!!

बेटा : (कुत्सितपणाने) ऐकलंस ना मोदीजींचं भाषण? फू:!! मी आयुष्यात इतकं बंडल भाषण कधीही करणार नाही! एकोणसाठ वेळा आपल्या पक्षाचं नाव घेत त्यांनी दूषणं दिली!!

मम्मामॅडम : (हातातली चिठ्ठी तपासत) दीडशे वेळा...महाराष्ट्रातल्या नाना पटोलेजींनी मोजून आकडा पाठवलाय!

बेटा : (विजयीवीराच्या आविर्भावात) अब उनकी उलटी गिनती शुरु हो गई है, मम्मा! पण मला एक कळत नाही, विधेयक पडणार, हे माहीत असूनही मोदीजी आणि शहाजींनी ते पुढे का रेटलं असेल?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com