ढिंग टांग : शिकारीची तयारी..! (एक रोमांचक अरण्यकथा...)

अरण्यातल्या एका सकाळी वाघाच्या चाहुलीने सारे जीवसृष्टी हलाखीत; मचाणावर बसलेल्या सुप्रसिद्ध शिकारी-कम-फोटोग्राफरच्या मनात मात्र वाघांचे जीपीएस लोकेशन, फोटोसेशन आणि डळमळीत स्टुडिओची चिंता
ढिंग टांग : जंगलात फोटोग्राफी की मातोश्रीवर स्टुडिओ?; ब्रिटिश नंदी यांचा 'मोठ्या' आणि 'छोट्या' शिकाऱ्यावर खुसखुशीत कटाक्ष!

ढिंग टांग : जंगलात फोटोग्राफी की मातोश्रीवर स्टुडिओ?; ब्रिटिश नंदी यांचा 'मोठ्या' आणि 'छोट्या' शिकाऱ्यावर खुसखुशीत कटाक्ष!

Sakal

Updated on

अरण्यकथेतल्या कुठल्याही सकाळीप्रमाणे एक सकाळ. नेहमीप्रमाणे नेपतीच्या झुडपात खसफस झाली. वाघाचे मुस्कट दिसू लागले. त्याची चाहूल लागताच सातबायांचा कलकलाट करणारा थवा भुर्रकन दुसरीकडे उडून गेला, आणि पुन्हा कलकलाट करू लागला. पाठवठ्याजवळ अर्जुनाच्या वृक्षावर टपून बसलेल्या मत्स्यगरुडाने मच्छीमारीचा नाद सोडून झाडावरच एखादी पालबिल मिळते का, ते पाहू लागला. पाठवठ्यातली ब्राह्मणी बदके आणि हुदाळे पाण्यात बुडाली. (खुलासा : हे दोन्ही प्राणी प्रस्तुत लेखकाने कधीही पाहिलेले नाहीत. पण अरण्यकथेत असतात म्हणून इथेही आहेत.) पलीकडच्या पाषाणावर बसलेले बिबट निमूटपणाने उठून गेले. सांबरांचा कळप उधळला. शेवरीच्या झाडावरल्या वानरांच्या टोळक्यात धावपळ झाली...हुश्श! येवढे सगळे एका वाघाच्या मुस्कटामुळे घडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com