
A Visionary Scientist Passes Away : डॉ. नारळीकर हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वैज्ञानिक होते. सर फ्रेड हॉइल यांच्यासह त्यांनी मांडलेला ‘हॉइल-नारळीकर सिद्धांत’ हा ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयक विचारांना एक धाडसी वैकल्पिक दिशा देणारा होता. कारण त्या वेळी ‘बिग बँग थियरी’ला सर्वांचा पाठिंबा होता. त्या थियरीला विरोध करणे अतिशय कठीण होते. पण ते नारळीकर यांनी करून दाखवले.