
"Integrity in Police Leadership: The Rare Legacy of Sadanand Date"
Sakal
जयेश शिरसाट
पोलिस दलात उच्च पदांवर असलेले अनेक जण न्यायाची, सत्याची कास धरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडतात, हे खेदाने नमूद करावे लागेल. सदानंद दाते यांच्यासारखे काही त्यास अपवाद आहेत. घटनेचा मान राखण्याची शपथ तंतोतंत पाळणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये दाते यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ते पोलीस दलांच्या नभांगणातील तारा आहेत, ही प्रतिक्रिया आहे सुपरकॉप ज्युलिओ रिबेरो यांची.